आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:गोदामातील उपलब्ध खतसाठ्याची माहिती न दिल्यास विक्रेत्यांवर कारवाई; कृषी निविष्ठा विक्रेत्यांना माहिती देणे बंधनकारक

जाफराबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी सेवा केंद्र चालक व कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या खात्याचा स्टॉक व गोदामाबाबत कृषी विभागाला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेवर माहिती न दिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

७ जुन पासुन खरीप हंगाम सुरू झाला आहे त्यासाठी शेतकरी शेताकडे वळले आहे. तर खरीप हंगामाला लागणारे बी-बीयाणे खत औषधी किटक नाशके कृषी सेवा केंद्र चालकांनी खरेदी करून ठेवले आहे. कृषी सेवा केंद्र चालकांनी कोणत्या गोदामात खरीपासाठी लागणाऱ्या वस्तु किती ठेवल्या याची माहिती कृषी विभागाला सांगणे बंधनकारक आहे. जर माहिती दिली नाही आणि कृषी विभागाने केलेल्या तपासणीत साठा आठळून आल्यास त्यावर आता कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा तालुका कृषी अधिकारी संतोष गायकवाड यांनी दिला आहे.तर शेतकऱ्यांनी चांगला पाऊस पडल्याशिवाय लागवड करु नये व डबल पेरणीचे संकट ओढवुन घेवु नये तसेच बि.बीयाणे खते किटकनाशके खरेदी करतांना घेतलेल्या कृषी विषयक बिलाची पावती, वस्तुचे लेबल डेडबार होण्याची तारीख यासह यासंबंधी विविध बाबींचे निरीक्षण करुनच शेतकऱ्यांनी वस्तु खरेदी कराव्या व काही सशंयासस्पद आढळुन आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे अवाहनही त्यांनी केले.

बिल घेतल्याशिवाय खरेदी करू नका : शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदी करताना विक्रेत्यास बिलाची मांगणी करावी. एखादया विक्रेत्याने बिल न दिल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. अन्यथा स्वतः तालूका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रत्येक विक्रेत्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कृषी सहायकाची : तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची कुठे फसवणूक होते. कुणाकडे खताचा किंवा बियाण्याचा साठा किती आहे यावर बारकाईने कृषी सहायक लक्ष ठेऊन असणार आहे. एखादया कृषी केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे निरदर्शनास आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई करण्यात येणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील केंद्र चालकांनी वेळेत खाताच्या साठ्याची माहिती देणे बंधनकारक आहे. व शेतकऱ्यांना विकेलेल्या मालाचे बिल देणे बंधनकारक आहे. खताचा व बियाण्याचा काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. खतासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये नसता कारवाईला समोरे जावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...