आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अनधिकृतरीत्या आरागिरण्या चालवणाऱ्यांवर कारवाई

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लक्कडकोट भागात अवैध आरागिरण्या सुरू असल्याची माहिती मिळाली होती. याआधारे औरंगाबादसह जालन्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करून ६ आरागिरण्यांच्या चालकांवर कारवाई केली. यात चार अवैध आरायंत्रांसह जळतणही जप्त केले आहे.औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे वनसंरक्षक सत्यजित गुजर, उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी अभिमन्यू खलसे, अभय अटकळ, सुशील नांदवटे, वनपाल बुरकुले, वनपाल पचलोरे, वनपाल गाडगीळ, वनपाल राठोड, वनपाल कुमावत, वनपाल कांबळे, वनरक्षक दांडगे, तेलंग्रे ,मुटके ,राठोड, शिंगारे, सोडगीर, पाटील, मांटे, वाकोदकर, नाईकवाडे, पवार, दाढे, मुऱ्हाडे, अनिल जाधव, सोनू जाधव, अस्मा पठाण, अनिता भावले, कविता निकोले यांनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...