आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:येणाऱ्या निवडणुकींची कार्यकर्त्यांनी जोराची तयारी करावी : मा.आ. भांबळे

सेलूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लवकरच जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगर परिषद या निवडणुका होणार आहेत. व या निवडणुका खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे जिल्ह्यातील सर्व नेते तुमच्या पाठीशी आहेत. जिंतूर व पाथरी न. प.वर राष्ट्रवादीची सत्ता आहे.

तिथे केंद्र व राज्य सरकारचा जास्तीत जास्त निधी आणून सर्वांगीण विकास झालेला आहे. सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी न.प. वर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन सेलु-जिंतुर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी सोमवारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सेलू तालुका कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन येथील साई नाट्यगृहात करण्यात आले होते.

यावेळी अध्यक्षस्थानी खासदार फौजिया खान होत्या तर व्यासपीठावर, बाबजानी दुराणी, मा. आ. भांबळे, माजी खासदार सुरेश जाधव, जि. प. सदस्य अशोक काकडे, डॉ. संजय रोडगे, राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्ष प्रेक्षाताई भांबळे, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख निर्मलाताई लिपणे, विनायकराव पावडे, जमीरभाई पटेल, सारंगधर महाराज, अली अहेमद खान, सुधाकरराव रोकडे, अजय डासाळकर, चंद्रकांत गाडेकर, रहीम पठाण, रघुनाथ बागल, पुरुषोत्तम पावडे, अॅड. बालासाहेब रोडगे, मनीषा केंद्रे, आशा काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...