आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाफराबाद भोकरदन विधानसभेचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त माहोरा येथील स्व. भास्कररावजी शिंगणे विद्यालयात शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्वराज्य प्रतिष्ठान माहोरा अध्यक्ष संदीप पोटे यांच्या वतीने शालेय साहित्य चित्रकला वही, रंगपेन बॉक्स, रजिस्टर व पेन वाटप करण्यात आले. या साहित्य वाटपामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचे नाव समाजात उज्वल करून समाजातील लहान मोठ्या व्यक्तींशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे आवाहन संदीप पोटे यांनी केले. यावेळी शिक्षक विनोद मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगून गरजू विद्यार्थ्यांना आमदार संतोष दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाचे कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक नरेंद्र सिरसाठ, संतोष गाडेकर, विजय नरोटे, देवमन खुळे, सतिष दळवी, किरण साळवे, बालाजी जाधव, संजय पट्ठे, दिलीप तडवी, श्रीकृष्ण कानडजे, वैशाली जंजाळ, संदीप जाधव, भरत बोराडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मिसाळ तर आभार प्रदर्शन विजय नरोटे यांनी केले.
दरम्यान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामाेरे जावे लागते. विद्यार्थीही अनेकदा अडचणी असल्याने त्या सांगत नाही अशा बाबींमुळे शिक्षणासाठी अडचणी येतात. ही बाब लक्षात घेता हा उपक्रम राबवल्याचे विद्यार्थ्यांना स्वराज्य प्रतिष्ठान माहोरा अध्यक्ष संदीप पोटे यांनी यावेळी सांगीतले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक संदिप पोटे यांचे यावेळी आभार व्यक्त केले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.