आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अग्र माधवी व अग्र युनिक ग्रुपच्या माध्यमातून उपक्रम; सावन तीज महोत्सवात महिलांचा उत्साह

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्षाबंधन, नागपंचमी सणांचे औचित्य साधून अग्र माधवी व अग्र युनिक ग्रुप च्या वतीने रविवारी मधुसूदन रिसॉर्ट येथे आयोजित “ सावन हरियाली तीज महोत्सवात “ महिला व लहान बालकांनी धमाल करत आनंद लुटला.

जेष्ठ समाजसेविका सावित्री मल्लावत शोभा देवीदान, यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्दघाटन झाले.अग्र माधवी च्या संस्थापक अध्यक्षा सौ. संगीता गुप्ता, अग्र युनिकच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री अग्रवाल, अनिता अग्रवाल, सोनल मित्तल, अग्र माधवी च्या अध्यक्षा पुनम भरतीया, ललीता अग्रवाल, तेजल अग्रवाल, श्वेता अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. संगीता गुप्ता यांनी सांगितले, महिलांना जीवनाचा आनंद घेता यावा, त्यांच्यातील कलात्मकता समोर यावी या दृष्टीकोनातून महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा सर्व घटकांतील महिलांनी सहभाग घेतला. या बद्दल संगीता गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले.

“राजपूताना थीम “ वर आधारित फॅन्सी ड्रेस स्पर्धेत महिला गटात पुनम बागडी ( प्रथम), सुरक्षा अग्रवाल ( द्वितीय), पुजा शर्मा ( तृतीय), बाल गटात: शनाया गुप्ता, निया गुप्ता, स्फुर्ती कामड, छबी कोठारी विजेत्या ठरल्या त्यांना पारितोषिके देण्यात आली. सुञसंचालन सोनल मित्तल व जयश्री अग्रवाल यांनी केले तर ललीता अग्रवाल यांनी आभार मानले. यावेळी सरिता धानवाला, रॉवी कोठारी, दामिनी अग्रवाल, अंजली अग्रवाल, संतोष तवरावाला, ज्योती अग्रवाल, सीमा मित्तल, सुरेखा अग्रवाल, वर्षा अग्रवाल, सपना अग्रवाल,विजया अग्रवाल, भारती नाव्हावाला ,आरती अग्रवाल, रेणू बंसल, काजल गोयल, मोनिका पित्ती ,नयना अग्रवाल, पायल अग्रवाल, पूजा गर्ग, सुरभी कामड, अंजली गोयल, जया गोयल,सोनल अग्रवाल,शीतल मोर यांच्या सह महिलांची उपस्थिती होती. या वेळी विविध खेळ, स्पर्धा घेण्यात आल्या. महोत्सव स्थळी दुकाने, स्वादिष्ट मिष्टान्नांच्या स्टॉल्सला महिलांनी भेट देऊन खरेदी केली.

बातम्या आणखी आहेत...