आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:ई-पीक पाहणी अॅपच्या व्हर्जन २ ची माहिती देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी थेट बांधावर

पिंपळगाव रेणुकाई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरिपात झालेल्या पेरणी क्षेत्रात आणि प्रत्यक्ष नोंदणीत तफावत राहु नये म्हणून ई पिक पाहणी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यास भोकरदन तालुक्यात सुरूवात झाली आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा असला तरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नसल्याने अनेकांना ह्या नोंदी कशा घ्यायच्या याबाबत माहिती नसल्याने बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे.

या वेळी तहसीलदार सारीका कदम उपस्थित होत्या.राज्य शासनाचा ई पीक पाहणी हा महत्त्वकांक्षी उपक्रम सोमवार १ ऑगस्टपासुन सुरू करण्यात आला. मर्यादीत काळापर्यंत या नोंदी शेतकऱ्यांना कराव्या लागणार आहेत. या उपक्रमाची अंमलबजावणी भोकरदन तालुक्यात गावागावात महसुलकडून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी शेत शिवारात जात शेतकऱ्यांशी या योजनेबाबत संवाद साधत मार्गदर्शन केले. या उपक्रमात शेतकऱ्यांनी स्मार्ट फोनच्या माध्यमातून पिकाची नोंदणी करायची आहे.

यानंतर तलाठी पिंकाची नोंदणी सातबाऱ्यावर उतरविणार आहेत. त्या करीता शेतकऱ्यांना शेत शिवारात जाऊन नोंद घ्यायची आहे. ज्या क्षेत्रात पीक असतील त्या ठिकाणचे छायाचित्रे या अॅपवर शेतकऱ्यांना डाऊनलोड करावे लागणार आहे. माञ अनेक शेतकऱ्यांना हे अॅपच डाऊनलोड करता आले नाही. तर अनेकांच्या फोनची कँपेसीटी कमी आहे. यामुळे हे अॅप डाऊनलोड होत नाही. तर अनेकांकडे स्मार्ट फोनच नाही. यामुळे ई पीक पाहणीची नोंद कशी करायची हा प्रश्न आहे. सदर योजना राज्यशासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केली आहे. पिक पेऱ्यासोबत हमीभाव दराने शेतमाल विकायचा का असा प्रश्न शेतकऱ्यांना या अॅपवर विचारला जाणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी हो असे उत्तर दिले तर त्याची नोंद पुरवठा विभागाकडे होणार आहे.

स्वतंत्रपणे हमी केंद्रावर जाऊन हमी दराने शेत विक्री करण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज आता शेतकऱ्यांना पडणार नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अँप मध्ये नोंद केल्यानंतर ४८ तासांमध्ये त्यामध्ये दुरूस्ती करता येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन व्हर्जन टु अँप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर या सर्व नोंदी होणार आहेत. या अॅपमध्ये पिकाचा फोटो घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून शेत किती दूर आहे याची नोंद होणार आहे. जर शेतकरी निवडलेल्या गटापासुन दुर असेल तर तशा सूचना त्यावर असणार आहे. तालुक्यात जवळजवळ १५७ गावांचा समावेश आहे. संपूर्ण गावात महसूल विभागाकडून जनजागृती सुरू असून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, असे तहसीलदार सारीका कदम म्हणाल्या.

तरच मिळेल पीक विमा
शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची आॅनलाईन नोंद केल्यानंतरही स्वयं घोषणापञ तलाठ्याकडे सादर करावे लागणार आहे. यानंतर तलाठी यातील दहा टक्के क्राॅस चेकींग करणार आहे. यानंतर अंतिम नोंद सातबाऱ्यावर घेतली जाणार आहे. पीक विमा, विमा दावे, नैसर्गिक आपत्ती काळात झालेल्या नुकसानीसाठी ही नोंद महत्त्वाची ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...