आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतांचे स्मरण:रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करणे हेच रस्ते अपघातातील मृतांचे स्मरण

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ते अपघातातील मृतांचा जागतिक स्मृतिदिन जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृतांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करून घेण्यात आला.

रस्तेअपघात मृतांचे स्मरण हेल्मेट सीट बेल्ट रस्ता सुरक्षा रॅली घेऊन करण्यात आले. सदर रॅलीचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस, एसटी महामंडळ, ड्रायव्हिंग स्कूल, स्कूल बस संघटना, वाहतूक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. आझाद मैदान पासुन रॅलीस सुरवात करण्यात आली. समारोप सजालना बसस्थानकात करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमास एआरटीओ विजय काळे, पोलिस विभागाचे जाधव, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक नेहुल, नाईक, लांडगे, माने ड्रायव्हिंग स्कूल, स्कूल बस प्रतिनिधी बिरायतकर, वाहतूक संघटना हजबे मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक यांची उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. रॅलीचा समारोप जिल्ह्यातील रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या अनुभव कथनाने झाला. यावेळी लक्ष्मण तुकाराम मदन यांनी त्यांच्या मुलाचा मृत्यू हा दुचाकी अपघातात हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे सांगितले. आमच्या कुटुंबियास ठेच लागली, यातून आपण शहाणे व्हा, संपूर्ण रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा असा संदेश त्यांनी दिला.

परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी लिहिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील रस्ते अपघातात मृत्यूमध्ये घट करण्यासाठी जालना जिल्ह्यात सुरक्षित रस्ते, समृद्ध जालना हा कार्यक्रम जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने निश्चित केल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले. आपल्या जिल्ह्यातील रस्ते अपघातांतील मृत्यू हे प्रामुख्याने दुचाकी चालकांचे असून ते मुख्यत्वे जालना-अंबड-वडीगोद्री-शहागड या रस्त्यावर होत असून त्यात घट घडवण्यासाठी या मार्गावर दुचकी चालकांकडून रस्त्याच्या डाव्या बाजूचा वापर, हेल्मेटचा वापर, दुचाकींना दोन्ही आरसे असणे, मोबाईल न वापरणे आदी गोष्टींबाबत सुरुवातीस जागृती करुन नंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे विजय काठोळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...