आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मुख्य प्रशासकीय इमारतीत महसूल विभागांतर्गत कार्यरत १६ कर्मचारी मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कार्यालयात न आल्यामुळे त्यांना नोटिसा बजावत २४ तासांत खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. शिवाय, खुलासा असमाधानकारक असल्यास एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा इशारा दिला होता. यामुळे बुधवारी कर्मचारी नियमित वेळेत पोहोचले व दुपारी ४ वाजेपर्यंत खुलासेही सादर केले.
त्यामुळे यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे यापुढे बायोमेट्रिक हजेरी असेल तरच वेतन काढले जाईल, अन्यथा वेतन कपातीसह नियमानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी बायोमेट्रिक मशीनमधील तांत्रिक दुरुस्ती करत काही नवीन मशीनही मागवल्या आहेत. कर्मचाऱ्यांना सूचना देऊनही नेहमी दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे प्रशासनाने ही कडक पावले उचलली असल्याचीही चर्चा आहे.
महसूल यंत्रणा रडारवर, कर्मचाऱ्यांतून संमिश्र प्रतिक्रिया
जिल्हाधिकारी डॉ. राठोड हे सर्वच यंत्रणांचे प्रमुख आहेत. मात्र त्यांनी सुरुवातीला महसूल विभागालाच फैलावर घेतले आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून महसूल कर्मचारी तरी येतात, काही विभागात तर अधिकारी-कर्मचारी सतत गायब असतात, बोटावर मोजण्याइतक्या कर्मचाऱ्यांवर कार्यालय चालते. यामुळे सर्व विभागाला सारखा नियम असावा, उशिरा येण्याबद्दल किंवा न सांगता गैरहजर राहणाऱ्यांवर कार्यवाही करायची तर सर्वच विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर व्हायला हवी अशी चर्चाही होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.