आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अॅड. लोखंडे यांचा मृत्यू अपघाती की घातपात

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अयोध्यानगरात गुरुवारी रात्री १० वाजेदरम्यान घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अॅड. किरण अनिल लोखंडे यांचा मृत्यू झाला. मात्र यात घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे घटनेची सर्व बाजूने सखोल चौकशी करावी अशी मागणी जिल्हा वकील संघाने केली असून तसे निवेदन शनिवारी एएसपी विक्रांत देशमुख यांना दिले.

याप्रकरणी मृत अॅड. लोखंडे यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपासादरम्यान मृत अॅड. लोखंडे यांची दुचाकी राममुर्ती शिवारात बेवारस अवस्थेत आढळून आली.

एका गुरे चारणाऱ्या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही दुचाकी पोलिस ठाण्यात जमा केली. अपघातस्थळाचा पंचनामा करून त्याठिकाणाहून दोन गॅस सिलिंडर ताब्यात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने ते गॅस एजन्सीकडे जमा करण्यात आले. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तो औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

प्रथमदर्शनी गळती नाही
मी घटनास्थळी पाहणी केली मात्र गॅसगळती झाल्याचे दिसून आले नाही. दैनंदिन स्वयंपाकासाठी सिलिंडर वापरला जात होता, यामुळे नेमकी गॅस गळती कशी झाले हे पाहावे लागेल. पोलिस तपासातही कारण निष्पन्न होईल. नागरिकांनी गॅस वापरताना काळजी घ्यावी. स्वयंपाकानंतर बटन बंद करावे, घराबाहेर जाताना बटन बंद असल्याची खात्री करावी. बाहेरून आल्यावरही दारे-खिडक्या उघडल्यानंतर गॅस सुरू करावा, ज्वलनशील पदार्थ दूर ठेवावे. गॅसचा वास आल्यास एजन्सीला कळवावे. - नीलेश लंके, एरिया मॅनेजर, भारत गॅस जालना विभाग)

बातम्या आणखी आहेत...