आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:जांबसमर्थ मूर्तींच्या तपासासाठी अॅड. अर्जुन राऊतांचे उपोषण

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामींच्या देव्हाऱ्यातील प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची चोरीचा तपास लागला नाही. त्यामुळे ॲड. अर्जुन राऊत यांनी शनिवारपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांना विविध पक्ष, सामाजिक संघटना व सामान्य नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. तथापि राज्य शासन आणि प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा ॲड. राऊत यांनी घेतला आहे.

सकाळी बडी सडक येथील श्रीराम मंदिर येथे दर्शन घेऊन विधिवत पूजन करत त्यांनी उपोषणास प्रारंभ केला. सायंकाळी जागरण गोंधळ घालण्यात आला. मनोज महाराज गौड, आमदार कैलास गोरंट्याल, भास्करराव अंबेकर, संतोष सांबरे, रमेश गव्हाड, राजेश राऊत, रवींद्र राऊत आदींनी भेट देऊन राऊत यांना समर्थन दर्शवले.

बातम्या आणखी आहेत...