आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अक्षय्य तृतीयेनंतर मेंढ्यांचे होते पूजन, लाख पाडण्याचा कार्यक्रम; शेतकऱ्यांच्या शेतात केला जातो कार्यक्रम उत्साहात साजरा, मेंढरांची करण्यात आली विधिवत पूजा

टेंभूर्णी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय्य तृतीयेनंतर येणाऱ्या चार पाच दिवस मेंढरांची विधीवत पुजनासह लाख पाडण्याची परंपरा धनगर समाजाने टेंभूर्णी परिसरात आजही कायम जपली आहे. यासाठी अक्षयतृतीयेच्या काही दिवस अगोदर पासून सर्वच मेंढपाळ आपली मेंढरं घेवून गावाजवळ येतात. टेंभुर्णी येथे बुधवारी येथील शेतकरी अमोल पवार यांच्या शेतात हा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. एकेकाळी मोठ्या संख्येने असलेली मेंढर आज कमी झाली असली तरी टेंभुर्णी गावात अद्यापही मेंढरांचे ११ खांड आपलं अस्तित्व टिकवून आहे.

या खांडात मिळून जवळपास २५०० च्या वर मेंढरं असल्याचे मेंढपाळ कारभारी जोशी यांनी सांगितले. दरवर्षी अक्षय्य तृत्रियाच्या दुसऱ्या दिवशी सर्वच मेंढपाळ आपल्या या धनवैभवाचे पूजन करतात. यासाठी मेंढपाळांचा सर्व परिवार भल्या पहाटेपासून या पूजनाच्या ठिकाणी गर्दी करत असतो. याठिकाणी मेंढपाळाची कारभारीण आपल्या मेंढरांचं विधीवत पूजन करते. याशिवाय वारूळाचे पूजन, लाख पाडणे आदी कार्यक्रम जातात. वर्षातून एकदा होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मेंढपाळांच्या कुटुंबात एकच उत्साह संचारलेला असतो.

दरम्यान, अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात लाख पडण्याचा कार्यक्रम केल्या जातो त्या शेतकऱ्याला मेंढपाळांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते दरम्यान मेंढपाळांच्या घरधनी यावेळी नैवेद्य घेऊन शेतात येतात व मेंढपाळाचे संपूर्ण कुटुंब मेंढ्या सह वारुळाचे पूजन करून मेंढ्यांच्या घरातच स्नेहभोजनाचा सहपरिवार आनंद घेतात.

बातम्या आणखी आहेत...