आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चोरट्यांना पकडून ग्रामस्थांकडून बेदम चोप:परतूर तालुक्यातील सालगावात घटना, एक फरार

परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडल्याची घटना शहरापासून १२ किमी अंतरावरील सेलू रोडवर असणाऱ्या सालगाव येथे सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता घडली.

सालगावात सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास कुत्रे जोरजोरात भुंकण्याचा आवाज आला. गावातील काही जणांना संशय आल्याने आवाजाच्या दिशेने त्यांनी शोध घेतला. यावेळी तिघेजण अंधारात लपून बसल्याचे आढळून आहे. ग्रामस्थांनी चारही बाजूने घेरा घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तिघा जणांपैकी एक जण पळून गेला व इतर दोघांना पकडून जमावाने बेदम मारहाण केली. मध्यरात्री संपूर्ण गाव जागे झाल्याने सगळीकडे आरडाओरड सुरू होती. पोलिस पाटील बापूराव केशवराव सालगावकर यांनी तातडीने याबाबत परतूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले दोघे व पळून गेलेला एक असे तिघेही परतूर शहरातील परधीवाडा भागातील रहिवासी आहेत. उत्तम भिका गायकवाड व संजय शिवाजी चव्हाण अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत तर राहुल उद्धव काळे असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस पाटील बापूराव सालगावकर यांच्या फिर्यादीवरून वरील तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करत आहेत.

दिवसभर गावात केली रेकी ग्रामस्थांनुसार, आरोपींनी सोमवारी वेशांतर करून रेकी केली होती. सहा महिन्यांपूर्वी याच गावातील कृष्णा वासुदेव गाढवे यांच्या घरी चोरी झाली होती. यावेळी चोरट्यांनी कृष्णा वासुदेव गाढवे यांच्या पोटात चाकूचा वार करून गंभीर जखमी केले होते. त्या घटनेतील चोरदेखील हेच आसावेत असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...