आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर दुकानाला धडकले

शहागड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रॅक्टर दुकानासमोरील पलंगास जाऊन धडकला. याप्रकरणी ट्रॅक्टर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शहागड (ता.अंबड) येथे गुरुवारी घडली.गोंदी पोलिसांच्या पथकाला गुंगारा देण्यासाठी शहागड (ता.अंबड) येथून मुख्य रस्त्यावरून अवैध वाळू ट्रॅक्टर भरधाव निघाले होते.

जिल्हा परिषद शाळेजवळ ट्रॅक्टर आले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर सपना शूज सेंटर नावाच्या दुकानाला जाऊन धडकले. या धडकेत दुकानासमोरील लोखंडी पलंग तुटून पडला. याप्रकरणी दुकान मालक शेख शहबाज शेख पाशा मिया यांच्या फिर्यादीवरून योगेश जगन्नाथ उंबरे याच्या विरुद्ध गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...