आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:सात वर्षाच्या सेवेनंतर आशा वर्कर्संना‎ केले कमी, आंदोलन केले सुरू‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन‎ (सीटू) संघटनेच्या नेतृत्वाखाली‎ अशा पाटोळे, शशिकला पाटोळे,‎ जयश्री काळे या आशा सेविका‎ असून त्यांनी मागील सात‎ वर्षांपासून आरोग्य विभागात सेवा‎ केली. त्याच बरोबर कोरोणा‎ काळात जीव धोक्यात घालून‎ जनतेच्या आरोग्याची काळजी‎ घेतली. परंतु वरिष्ठांची सतत‎ मनमानीला विरोध केल्याने त्यांना‎ दोन महिन्यापूर्वी कोणतीच‎‎‎‎‎‎‎‎ पूर्वसूचना न देता कमवरून कमी‎ केले.

त्यांना आशा सेविकांना‎ कामावर पूर्ववत घ्यावे या मागणी‎ साठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत‎ उपोषण सुरू असून आज संघटनेचे‎ शिष्टमंडळ जिल्हा आरोग्य‎ अधिकारी भुसारे मॅडम व तालुका‎ आरोग्य अधिकारी सोनी मॅडम‎ यांना भेटून निवेदन देण्यात आले. व‎ चर्चा करण्यात आली.‎‎‎‎‎‎‎‎ शिष्टमंडळात ज्येष्ठ कामगार नेते‎ कॉ. अण्णा सावंत, सिटू चे‎ जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, डॉ.‎ सुनंदा तिडके, अनिल मिसाळ,‎ कांचन वाहुळे यांची उपस्थिती‎ होती. पण आज काही तोडगा‎ निघाला नाही म्हणून त्या आशा‎ कामावर घेतल्या शिवाय उपोषण‎ संपणार नाही असा निर्धार आशा‎ सेविकांनी केला.‎

बातम्या आणखी आहेत...