आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणज्योत मालवली:कापर्डा येथे पत्नीच्या मृत्यूनंतर‎ पतीनेही 5 तासांतच त्यागले प्राण‎

भोकरदन‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृध्दापकाळाच्या आजारात असताना पत्नीचा‎ मृत्यू झाल्यानंतर पतीनेही पाच तासांनंतर प्राण‎ सोडल्याची घटना भोकरदन तालुक्यातील‎ कोपर्डा येथे घडली.‎ पत्नी यशोदाबाई सुपडू ढोले (७५) यांचे‎ शुक्रवारी दुपारी २ वाजता निधन झाले. त्यांच्या‎ निधनानंतर ५ तासाने पती सुपडू उखर्डा ढोले‎ (८०) यांचेही निधन झाले. यशोदाबाई यांची‎ प्रकृती बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर‎ येथे उपचारासाठी नेले असता, रस्त्यातच‎ त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळेस त्यांचे‎ पती सुपडू ढोले यांना देखील दम्याचा त्रास होत‎ असल्याने त्यांनाही उपचारासाठी नेण्यात आले‎ होते.

ते दवाखान्यात दाखल झाले असता,‎ यशोदाबाई यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित‎‎‎‎‎‎‎‎ केले. त्यानंतर नातेवाइकांनी सुपडू ढोले‎ यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांनाही घरी‎ आणले. मात्र आपली पत्नी आपल्याला सोडून‎ गेल्याचे मोठे दुःख त्यांना झाले. यातच‎ सायंकाळी सुपडू ढोले यांनीही आपले प्राण‎ सोडले. दरम्यान, कोपर्डा येथे दोघांवर शनिवारी‎ सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात‎ आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना,‎ नातवंडे परिवार आहे. उद्योजक मधुकर ढोले‎ यांच्या ते काका काकू होत.‎

बातम्या आणखी आहेत...