आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिधापत्रिका, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना आणि विधवा यांचे प्रस्ताव विनाविलंब मार्गी लावण्यात येतील असे लेखी आश्वासन तहसीलदार रूपा चित्रक यांनी दिल्याने सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी आपले नियोजित उपोषण मागे घेतले. येथील तहसील कार्यालयात मागील एक ते दीड वर्षापासून धुळखात पडलेले शिधापत्रिका, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना,विधवा निवृत्ती वेतन आयोग, दिव्यांग वेतन आयोग योजना इतर प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी सोमवारपासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषण स्थळी सदरील योजनांच्या लाभार्थ्यांनी हजेरी लावत पाडेवार यांच्या उपोषणाला उत्स्फूर्तपणे साथ दिली.
तहसील कार्यालयात दाखल केलेल्या विविध योजनांच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती लाभार्थ्यांनी यावेळी पाडेवार यांना दिल्या. हे सर्व प्रस्ताव मागील एक ते दीड वर्षापासून दाखल झालेले आहेत.या प्रस्तावावर पुढील कार्यवाही न करता सर्व प्रस्ताव आवक-जावक विभागात धुळखात पडले होते.परंतु तहसील कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे हे प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत.
प्रस्ताव निकाली काढण्यासाठी नागरिक तहसिल कार्यालयात दररोज चकरा मारत होते, त्यांना कुठल्याही प्रकारचे समर्पक उत्तर मिळत नव्हते.परिणामी नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत होता. तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना गोरगरीब जनतेने प्रस्तावाबाबत विचारणा केली असता त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत होती असा आरोप पाडेवार यांनी निवेदनात केला होता.
तहसील कार्यालात असलेले प्रस्ताव तत्काळ मंजूर करून निकाली काढण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आहे. मात्र,तहसीलदार रूपा चित्रक यांनी स्वत: उपोषण स्थळाला भेट देऊन सर्व प्रस्ताव विनाविलंब मार्गी लावण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्याने पाडेवार यांनी उपोषण मागे घेतले. उपोषणास्थळी भगवानराव मोरे, द.या. काटे, विष्णू मुजमुले, सुरमासिंग जुनी, शेख, निसार भाई, गफार सौदागर, मलीक कुरेशी, बाळासाहेब पाडेवार, अविनाश पाडेवार, दिपक भदर्गे,राहुल, पाईकराव, शेख, सिराज, करण पाडेवार आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.