आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोराेना लसीकरण:तीन-चार महिन्यांनंतर सर्वांनाच मिळेल लस, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जालन्यात दिली माहिती

जालना / बाबासाहेब डोंगरे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासगीतही उपलब्ध होणार लस

राज्यात नोंदणी झालेल्या ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोराेना लसीकरण करून घ्यावे. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर व त्यानंतर आजारी ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. पुढील तीन-चार महिन्यानंतर उर्वरित लोकांचे लसीकरण होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी शनिवारी दिली.

जालना येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी आयोजित कोरोना लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. टोपे म्हणाले, ज्यांना लसीची गरज आहे, त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, दुर्लक्ष केले जाणार नाही. राज्यासाठी साडेसतरा लाख डोसची गरज आहे, प्रत्यक्षात १० लाखापर्यंत डोस मिळाले. यामुळे उर्वरित साडेसात लाख डोस मिळावेत, यासाठी येत्या सोमवारी किंवा मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना व्यक्तिश: पत्र लिहिणार आहे. तसेच पंतप्रधान यांनी लस मोफत देऊ, असे सांगितलेले आहे. फक्त त्यांच्याकडून ही लस येणे अपेक्षित आहे.

खासगीतही उपलब्ध होणार लस
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने गरजू व गरिबांचा लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर खासगी लोकांसाठीसुद्धा लस उपलब्ध होईल. खासगी क्षेत्रातील अनेक लोक कामगारांना लस द्यायची असे सांगत आहेत. मात्र, प्राधान्यक्रमाने लाभार्थी झाल्यानंतर उर्वरित लोकांसाठी ही लस उपलब्ध होईल.

लसीकरणाची आकडेवारी
(कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) : अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलडाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७०), सांगली (४५६), सिंधुदुर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०)

बातम्या आणखी आहेत...