आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती:अग्रवाल यांचा कार्य अहवाल सादर‎

परतूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाहेबांची शिवसेना जालना जिल्हा‎ प्रमुख मोहन अग्रवाल यांचा कार्यअहवाल‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे‎ गुरूवारी सादर करण्यात आला आहे.‎ यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, माजी‎ राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार संजय‎ शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन‎ महिन्यांपूर्वीच मोहन अग्रवाल यांची‎ जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली‎ आहे.

मागील तीन महिन्यांच्या कालावधीत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अनेक‎ युवकांचा पक्षप्रवेश करवून घेत संघटन‎ वाढविण्यावर भर दिला आहे. नुकत्याच‎ संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत‎ जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर सरपंच‎ आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले‎ आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी‎ अग्रवाल यांच्या कार्य अहवालावर‎ समाधान व्यक्त करत अधिक जोमाने पक्ष‎ संघटन मजबूत करण्याचे निर्देश दिले‎ असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली‎ आहे

बातम्या आणखी आहेत...