आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचे विघ्न:जळालेले रोहित्र, केबल न बसवल्यास आंदोलन ; पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण

कुंभार पिंपळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जळालेले तीन रोहित्र तसेच रोहित्रांसाठी केबल व किटकॅट तत्काळ बसवणे नसता महावितरण कंपनी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा ग्रामविकास युवामंचने दिला आहे.महावितरणचे सहाय्यक अभियंता कांबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, कुंभार पिंपळगाव येथील बकरी बाजारपेठ, सरस्वती भुवन महाविद्यालय समोरील लोकवस्ती तसेच ग्रामपंचायत परिसरातील रोहित्र गेल्या तीन महिन्यापासून जळालेले आहे.

यामुळे पिठाच्या गिरण्या बंद असुन पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच गौरी गणपतीचे आगमन होणार असून गावातील अनेक गणेश मंडळे, महिला वर्ग सजावट देखावे करण्यासाठी तयारीला लागले आहेत. परंतु सध्या गाव अंधारमय झाल्यामुळे चोरट्यांचा सुळसुळाट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणमी गौरी गणेश उत्सवावर विजेचे विघ्न निर्माण झाले आहे. जे ग्राहक नियमित विज बिल भरणा करतात त्यांना सोयी सुविधा मिळत नाहीत. केवळ गावाची वसुली नाही या कारणाने जळालेले रोहित्र तत्काळ न बसवणे हे निषेधार्थ आहे. ३१ऑगस्टपर्यंत जळालेले तीन रोहित्र तसेच रोहित्रांसाठी केबल व किटकॅट तत्काळ बसवून द्यावेत व गावातील विजेचे विघ्न दुर करावेत नसता १ सप्टेंबर रोजी महावितरण कंपनी कार्यालयास कुलूप लावून निषेध करण्यात येईल असा इशारा ग्रामविकास युवा मंचचे अक्षय चांडक, सुरेश कंटुले, महावीर व्यवहारे, प्रकाश बिलोरे, महारुद्र गबाळे, दिनेश दाड, संजय गोफने, वैभव कुलकर्णी, भागवत राऊत यांच्यासह आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...