आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वापरून त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे. याचा निषेध म्हणून भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तंजावर पासून ते अफगाणिस्तानपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. त्याचबरोबर समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली. तोच विचार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुढे नेत आहेत. परंतु, काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक सालोका बिघडवला जात आहे.

ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. त्यातच नवीन भर म्हणून की काय? महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी निषेधार्य वक्तव्य केले आहे. राज्यपाल कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर केलाच. परंतु,यापूर्वीही राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केले होते. एकंदरीत महापुरुषांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असे म्हणायला हरकत नाही.

याचाच निषेध म्हणून भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अनेक संघटनांसोबत चर्चा करून ३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे शिवसन्मानाचा निर्धार करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी सर्वाना आवाहन करत एकत्र येण्याचे ठरविले होते. त्यांना पाठिंबा म्हणून भोकरदन येथे मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटना सहभागी होवुन धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...