आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:सुभाषचंद्र देवीदान यांना अग्रविभूषण पुरस्कार, विविध संघटनांतर्फे सत्कार; धुळे येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलन जालना शाखेचे जिल्हाध्यक्ष तथा अ. भा. मारवाडी संमेलनाचे जिल्हाध्यक्ष सुभाषचंद्र देवीदान यांना अग्रविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

धुळे येथील हिरे भवन मंगल कार्यालयात रविवारी अग्रवाल समाज रजत जयंती प्रांतीय अधिवेशनात राष्ट्रसंत रमेश ओझा, साध्वी ऋतुंभरा, गाेभक्त संजीवकृष्ण ठाकूर, आचार्य इंद्रेश उपाध्याय, साध्वी चित्रलेखा देवी यांच्या हस्ते सुभाषचंद्र देवीदान यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वेळी प्रांताध्यक्ष कुमार चौधरी, पुरुषोत्तम जयपुरिया यांची उपस्थिती होती. मागील २२ वर्षांपासून मोतीराम अग्रवाल, श्रीकिशन अग्रवाल यांच्यासोबत सामाजिक कार्यात अग्रभागी असलेल्या सुभाषचंद्र देवीदान यांनी जालना शहर, सर्व तालुके व संमेलनाचे प्रांताध्यक्ष कुमार चौधरी यांनी समाजबांधवांची माहिती संकलित करून दोन वेळा “अग्रदर्पण’ या माहिती पुस्तिकेचे वितरण केले. सन २०१६ मध्ये जालना शहरात सुभाषचंद्र देवीदान यांनी दोनदिवसीय राष्ट्रीय पातळीवरील वधू-वर परिचय संमेलन घेतले. यात १४ राज्यांतील समाजबांधवांनी सहभाग घेतला होता तर ८१ विवाह जुळले. संकलित निधीचा २४ तासांत विनियोग, उर्वरित निधी परत करत ताळेबंद हिशेब ठेवून पारदर्शी कारभाराचा पहिला पायंडा सुभाषचंद्र देवीदान यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम निर्माण केला. जानेवारी २०२० मध्ये जालना शहरात समिती अध्यक्ष सुभाषचंद्र देवीदान यांनी स्वागताध्यक्ष घनश्यामदास गोयल, पुरुषोत्तम जयपुरिया, संजय एम. अग्रवाल, मनीष तवरावाला, अरुण मित्तल, रमेश अग्रवाल व समाजबांधवांच्या सहकार्याने अग्रकुंभ संमेलन यशस्वीपणे आयोजित केले. या संमेलनात १० हजार ५६० समाजबांधव सहभागी झाले होते.

समाजाप्रति त्यांची तळमळ, नि:स्वार्थ भावनेतून करत असलेल्या कार्याची दखल घेत राज्य संमेलनातर्फे सुभाषचंद्र देवीदान यांना मानाचा अग्रविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, पुरस्कार मिळाल्यानंतर मनोज महाराज गौड, पुरुषोत्तम जयपुरिया, वीरेंद्र धोका, रमेश अग्रवाल, संजय भरतिया, विजय बगडिया, सीए गोपाल अग्रवाल, अंकुशराव राऊत, एम. पी. पवार, अरुण मित्तल, गोवर्धन अग्रवाल, मनोहर सिनगारे, हेमंत ठक्कर, मनीष तवरावाला, राजेश पित्ती, विनोद पवार, उमेश पंचारिया, महेश भक्कड, हनुमान प्रसाद भारूका, ॲड. महेश धन्नावत, ॲड. अश्विनी धन्नावत, सुनील बियाणी, गणेशलाल चौधरी, बाबूराव सतकर, अशोक मिश्रा, राजेंद्र बजाज, ललित बिजावत, सौरभ पंच, डॉ. झंवर, मंत्री, जितेंद्र जैन, नितीन मुथा, संजय गोयंका, बालाजी बांडे, संतोष राजकर, सोमेश कोलते आदींनी सुभाषचंद्र देवीदान यांचा सत्कार केला.

अभिनंदनाचा वर्षाव
सुभाषचंद्र देवीदान यांना अग्रविभूषण पुरस्कार प्राप्त होताच ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सहभागी झालेल्या जालन्यातील उद्योजक, व्यापारी, लायन्स क्लब, जालना मर्चंट बँक, मारवाडी संमेलन, रेल्वे समिती पदाधिकारी व चाहत्यांकडून सुभाषचंद्र देवीदान यांना सपत्नीक वाजत गाजत सभागृहाबाहेर नेत. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तसेच ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करत आनंद लुटला.

बातम्या आणखी आहेत...