आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान‎:40 क्विटंल कापसाच्या गंजीसह शेतीसाहित्य‎ जळून खाक, चार लाख रुपयांचे नुकसान‎

भोकरदन‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला भाव‎ नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी‎ भाववाढीच्या आशेने कापसाची गंजी‎ मारून शेतात पत्र्याच्या शेडमध्ये किंवा‎ घरात साठवून ठेवलेला आहे.‎ भोकरदन तालुक्यातील जळगाव‎ सपकाळ येथील नंदू बुरकुले या‎ शेतकऱ्याने शेतात पत्र्याच्या शेडमध्ये‎ साठवून ठेवलेला चाळीस क्विंटल‎ कापूस सोमवारी दुपारी दोन‎ वाजेदरम्यान अचानक लागलेल्या‎ आगीत जळून खाक झाला.

शेतातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शेती साहित्य तसेच जनावरांसाठी‎ साठवून ठेवलेल्या भुशाच्या चाऱ्यासह‎ इतर साहित्य जळाल्याने शेतकऱ्याचे‎ मोठे नुकसान झाले. जवळपास चार‎ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अंदाज वर्तवण्यात आला आहे. या‎ शेतकऱ्याच्या पत्र्याच्या शेडला आग‎ लागल्याचे कळताच शेजारील‎ शेतकरी व ग्रामस्थांनी आग‎ विझविण्यासाठी धाव घेतली.‎

बातम्या आणखी आहेत...