आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कृषी संजीवनी सप्ताहास प्रतिसाद; शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन

जाफराबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका कृषी विभागामार्फत २५ जुन ते १ जुलैपर्यंत तालुका कृषी अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी सप्ताह राबविण्यात येत असुन यानिमित्त शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले जात आहे.

राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै हा कृषी दिन म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ही मोहीम कालावधीत खरीप हंगाम २०२२ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी, कृषी मित्र, जिल्हा परिषद, कृषी विद्यापिठे, कृषी विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ यांच्यासह कृषीशी संग्लहीत असलेले कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. कृषी संजीवनी मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आलेले आहे त्यानुसार २६ रविवार रोजी पोष्टीक तृणधान्य दिवस दिन तालुक्यातील पिंपळगाव कड आंतरपीक मुग व उडीद पिकाची लागवड तसेच बीबीएफवर सोयाबीनबद्दल मार्गदर्शन कृषी सहाय्यक संतोष गायकवाड व आत्मा योजनेचे मोरे यांनी केले. तर वरुड खुर्द बीबीएफ वर सोयाबीन पेरणीबद्दल तालुका कृषी अधिकारी एस. एच. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. २५ जुन रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार मुल्यसाखळी बळकटीकरण दिन साजरा करुन २६ जुन रविवार रोजी पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला. २७ जूनला महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण, २८ जून रोजी खत बचत दिन तर पुढील दोन दिवसात २९ जुन रोजी प्रगतशील शेतकरी संवाद दिवस, ३० जुनला शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिन, १ जुलै रोजी कृषी दिन कार्यक्रमाने या सप्ताहाची सांगता केली जाणार आहे.