आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानीची पाहणी:कृषीमंत्री अब्दुल सत्तार उतरले बांधावर; जालन्यातील वडीगोद्री येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

गेली अनेक दिवस कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे चर्चेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन केलेल्या वक्तव्यामुळे ते राज्याच्या राजकारणात चर्चेत आले होते. यानंतर त्यांनी आज अधिवेशन संपताच शेतकऱ्यांच्या बांधावर जात पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे.

राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री ता. अंबड येथील अवकाळी पाऊस व वादळीवारा मुळे नुकसान झालेल्या गहू पिकाची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, नायब तहसीलदार धनश्री बालचित, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्यासह महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

संबंधित वृत्त वाचा

शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही:अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सतत त्यांच्या विधानाने चर्चेत असतात. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत एक बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या विधानावरुन आज विधीमंडळात गदारोळ होण्याची शक्यता आहे. ​​​​

अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगावमधील नुकसानीची पाहाणी केली. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

बातम्या आणखी आहेत...