आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:भोकरदनला कृषिमंत्री सत्तार यांचा निषेेध तर परतुरात पदाधिकाऱ्यांचे जाेडे मारो आंदाेलन

परतूर, भोकरदन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्य करणारे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मंगळवारी शहरातील महादेव मंदिर चौकात जोडे मारा आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या नेतृत्वाखाली सदरील आंदोलन करण्यात आले. यावेळी अब्दुल सत्तरांच्या प्रतीकात्मक पूतळ्याला काळे फासून दहन करण्यात आले.

या आंदोलनात माजी नगराध्यक्ष अंकुशराव तेलगड, विजय राखे, अखिल काजी, महिला अध्यक्षा उर्मिला खाडे, माजी नगरसेवक आरेफ अली, युवक तालुकाध्यक्ष ओंकार काटे, बाळासाहेब घारे, कदिर कुरेशी, समता परिषदेचे मधुकर झरेकर, प्रभाकर धुमाळ, मोहन बाण, सरपंच सोनाजी गाडेकर, पंजाबराव अवचार, भागवत चव्हाण, राजेश तेलगड, शाहूराव मुंढे, कैलास मुळे, राजेभाऊ आघाव, अंकुश शिंदे, उत्तमराव पवार, गणेश मानवतकर, महेश नांगरे, संतोष साठे, प्रदीप कादे आदींची पदाधिकाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती.

शहरातील जयभवानी चौक ते महादेव मंदिर चौक दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा महादेव मंदिर चौकात आल्यानंतर महिला पदाधिकाऱ्यानी अब्दुल सतारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून, काळे फासून निषेध व्यक्त केला. संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी यावेळी अब्दुल सत्तारांच्या पुतळ्याचे दहन केले. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केले विधान निषेधार्य आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्तरांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...