आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र जाफराबाद तालुक्यातील वरखेडा फिरंगी येथे बुधवारी पार पडले. झेंडू, टमाटा, सीताफळ आदी ठिकाणी सुरू झालेली शिवारफेरी एक तास चालली. दुपारी चर्चासत्र घेण्यात आले. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय मोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दीपाली कांबळे (शास्त्रज्ञ, कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर यांनी “रब्बी हंगामातील आधुनिक लागवड तंत्रज्ञान”, या विषयावर माहिती दिली तर शास्त्रज्ञ, गृहशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूरच्या डॉ. साधना उमरीकर यांनी “परस बाग निर्मिती”ची तर कृषी सहायक विनायक मेहेत्रे यांनी “फळबाग लागवडीचे महत्त्व” सांगितले. अरुण धोंडीबा भदर्गे यांनी शेतीसाठी शासनाच्या विविध योजना तर श्रीकृष्ण गणपत ढाकणे यांनी शासनाच्या विविध पीक विमा योजनाबाबत माहिती दिली. ग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने देण्यात येणारा “ब्रँडेड नल ॲग्रो प्रेरणा पुरस्कार”.जगदीश ज्ञानेश्वर बंगाळे कृषी सहाय्यक यांना देण्यात आला.
यावेळी परसबाग निर्मितीसाठी बी - बियाणे किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला कृषी सहाय्यक निवृत्ती भगत, भानुदासराव डोईफोडे, नंदकिशोर देशमुख, दत्तात्रय जाधव, कृष्णा जाधव, नंदकिशोर शिंदे, डिगांबर जाधव, जमुना जाधव, सुनिता जाधव यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.