आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्चस्व प्रस्थापित:आहेर बोरगाव सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत पॅनलचे वर्चस्व

सेलू20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आहेर बोरगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत आहेरनाथ सिध्दनाथ शेतकरी विकास पॅनलने सर्व १३ जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राजेंद्र लहाने यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनलने सर्व जागा जिंकत शिवसेना व भाजप प्रणीत पॅनलचा पराभव केला. या निवडणूकीत बालासाहेब लहाने, शिवाजी लहाने, श्रीधर लहाने, वर्षा लहाने, ज्ञानेश्वर लिपणे, गुलाब लिपणे, प्रकाश लिपणे, यशवंत लिपणे, देवगणा लिपणे, अनिता नरवडे, आशामती काळे, राजेंद्र थळपती, त्रिंबक मोगरे हे उमेदवार विजयी झाले.

यावेळी अशोक लिपणे, निर्मलाताई लिपणे, सर्जेराव लहाने, प्रकाश लहाने, उमाजी लहाने, नेताजी लिपणे, सुदाम लिपणे, विश्वनाथ लिपणे, सर्जेराव लिपणे, बालासाहेब लिपणे, सुनिल लिपणे, लक्ष्मण मोगरे, नामदेव मोगरे ,परमेश्वर लहाने, बापुराव लहाने गजानन पाथरफळे, भागवत लहाने आदींनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...