आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत सोहळा:शहागड येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा सोहळा

शहागडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील शहागड येथे २१ ते २८ डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे. सात दिवसांत दररोज सकाळी पहाटे काकडा, विष्णुसहस्रनाम, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, संगीत श्रीमद् भागवत कथा, हरिपाठ, हरिकिर्तन, जागर व त्यानंतर संगीत भजन होईल.

तसेच अनिल महाराज तुपे, व्यंकटेश महाराज सोनवने, गोपिनाथ महाराज जरांगे, मधु महाराज वडगावकर, डॉ. प्रमोद महाराज कुमावत, प्रभाकर महाराज कावळे, पंढरीनाथ महाराज भाकड यांचे कीर्तन होणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकासह ग्रामस्थांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...