आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयेाजन:सातोना येथील हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयेाजन

सातोना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागृत हनुमान मंदिर हनुमाननगर सातोना खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा व ग्रंथराज पारायण सोहळा भागवत कथा प्रवक्ते भगवताचार्य मारुती दांगट यांच्या वाणीतून होत आहे. सोबत संजय फोके, बळीराम गव्हाड, चैतन्य कदम, ज्ञानेश्वरी पारायण सूर्यभान शेळके,शंकर आकात, अंकुश लाटे, जगन आकात, श्रीधर खंदारे, रेवणाथ रेंगे यांचीही हजेरी लाभणार आहे.

दरम्यान, या सोहळ्यात ह. भ. प. माऊली राऊत, ह. भ. प. मुकुंद महाराज गात, ह. भ. प. नामदेव महाराज फापाळ (सोनपेठ), ह. भ. प. दिलीप महाराज इसादकर (पंढरपूर), ह. भ. प. अर्जुन महाराज मोटे (पळसी), ह. भ. प. सतीश जाधव (बोररांजणी), ह. भ. प. सीताराम रेंगडे (राजाटाकळी), काल्याचे कीर्तन ह. भ. प. गणेशानंद शास्त्री भगवतिकर यांचे सकाळी ११ ते १ काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयेाजकांच्या वतीने केलेे आहे.

बातम्या आणखी आहेत...