आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील आलापुर ग्रामपंचायतीने शेतमजूर, गोरगरिबांसह आदिवासी भिल्ल समाजला जाणीवपूर्वक डावलून धनदांडग्यांना घरकुल योजनेचा लाभ दिल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. आलापूर येथे अत्यल्प उत्पन्न गटातील कष्टकरी शेतमजूर(आदिवासी भिल्ल) समाजाचे गरीब लोक असून मोलमजुरी करून आपले उदारनिर्वाह करीत आहे. आतापर्यंत कोणतेच योजनेचा लाभ या लोकांपर्यंत पोहचला नसल्याचा आरोप केला आहे.
विकासापासून कोसोदूर असलेल्या या समाजाला आतापर्यंत कोणत्याच योजनेचा लाभ मिळाला नसुन पंतप्रधान आवास योजने साठीच्या पहिल्या यादीत आदिवासी बिल्ले समाजाचे नावे असताना सदरील यादीतील नावे हेतुपरस्पर डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे. आलापुर गावातील लोकप्रतिनिधींनी व ग्रामसेवकांनी या यादीतील प्राधान्यक्रम देखील बदलला आहे. ज्या लोकांनी पैशाचे व्यवहार केले आशा धनदांडग्यांना ज्यांचे अगोदरचे घरे आहेत अश्याना या योजनेचा लाभ दिला आहे.
सदरील योजनेत अनेक लाभार्थ्यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित अभियंता यांच्याशी चिरीमिरी करून या योजनेचा फायदा घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजना ड सर्वेमधील प्रतीक्षा यादीव इतर गरीब कल्याण योजनेपासून वंचित असल्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी करुन आमच्या सारख्या कष्टकरी, मजूर जे कि खरे लाभार्थी लाभ देण्याची मागणी केली आहे.
आलापूर येथे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा करावा तेव्हा आपणास कळेल या समाजाची व्यथा अशी मागणी केली आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा आणि सदरील प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन न्याय द्यावा; नसता आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर सलीम तडवी, रहेमान तडवी, जावेद तडवी, मुस्ताक तडवी, आश्फाक तडवी, मस्तान तडवी, सुलतान तडवी, मुदसर तडवी, रामशेर तडवी, जिलानी तडवी, रशी तडवी, सादीक तडवी, शाहरूख तडवी यांच्यासह २५ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.