आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:लव्ह जिहादविरोधात परतुरात सकल हिंदू समाजाचा मोर्चा

परतूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लव्ह जिहादविरोधात तातडीने कठोर कायदे करावे व तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मुख्य मागणीसह जिहाद व गोवंश हत्या बंदीसाठी सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी रोजी शहरात विराट मोर्चा काढण्यात आला.

गाव भागातील नारायण दादा चौक या ठिकाणावरून मोर्चाला सुरुवात झाली. सरकारने लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करावा दिल्लीत घडलेली श्रद्धा वालकर हत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्यसरकारने पुढाकार घ्यावा अश्या मागण्या सहभागी विविध हिंदू संघटनानी केला.दरम्यान, यावेळी हिंदू एकात्मेची आणि लव्ह जिहाद विरोधात लढा उभारण्याची शपथ घेतली.यानंतर मोंढा भागातील सराफा मार्केट मध्ये मोर्चाचा समारोप करण्यात आला. धर्मातर कायदा राज्यासह देशात लागू करण्यात यावा. दिल्लीतील श्रद्धा वालकर याचा खून करण्याचा आरोप असलेल्या आफताबला फाशी देण्यात यावी आदी मागण्या या मोर्चात करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...