आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा चे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांकडुन छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ ७ डिसेंबर बुधवारी मराठा क्रांती मोर्चा, समविचारी पक्षच्या वतीने जालना जिल्हा बंद ची हाक देण्यात आली आहे. या बंदला पाठींबा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना महाविकास अघाडीच्या वतीने जालना जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यासाठी व महाराष्ट्राची अस्मिता आबाधित ठेवण्यासाठी समाजातील सर्व समाज घटकांनी या बंदमध्ये सामील व्हावे असे आवाहन माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केले आहे.
प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात असे म्हटले की, भाजपा व त्यांच्या नेत्यांकडुन वेळोवेळी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातल्या जात आहे.मागच्या काळात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरूध्द चुकीचे अपशब्द वापरले यामध्ये तमाम शिवप्रेमींचे मने दुखावली. दरम्यान वारंवार भाजपाचे नेते महाराजांबद्दल अपशब्द वापरत आहे.यात दुर्दैवी असे की हे वक्तव्य करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्याऐवजी भाजपा याची पाठराखण करत आहे.आज महाराष्ट्रातील अनेक उद्योग पळविले जात आहे.
दरम्यान महाराष्ट्र ही संतांची तसेच महापुरुषांची भुमी आहे. यापुढे या महापुरुषांचा अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही असा ईशारा मा. आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी पत्रकात दिला आहे. उद्या जिल्हाभरात बंद पाळण्यात येणार असुन सर्व समविचारी पक्ष, संघटना,मराठा क्रांती मोर्चा तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी सकाळी १० वाजता शहरातील महादेव मंदिर चौकात उपस्थित राहुन या घटनांची निषेध व्यक्त करण्याचे आवाहन जेथलिया यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.