आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपले एक रक्तदान एका व्यक्तीचा जीव वाचवू शकते. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास रोटरी मिडटाउन सदैव तत्पर असून रक्तसाठा वाढविण्यासाठी समाजातील समाजातील सर्व घटकांनी स्वेच्छेने पुढाकार घ्यावा. असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउनचे अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन च्या वतीने प्रभारी पोलिस अधीक्षक राणा सुधा यांच्या प्रेरणेने बुधवारी जनकल्याण रक्तपेढी येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५० दात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. शिबीराच्या उद्घाटन अॅड. महेश धन्नावत यांनी केले. यावेळी मनोज महाराज गौड, भन्ते शिवनी शाक्यपुञ, पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय पैठणे, पोलिस निरीक्षक केशव येरमुरे, पुसाराम मुंदडा, रोटरीचे संचालक अभय करवा, शिवराज जाधव, शेख नजीर, प्रू भालेराव यांची उपस्थिती होती. अॅड. धन्नावत म्हणाले, सामाजिक दायित्व म्हणून रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिर घेतले असून रोटरी मिडटाउन चे पदाधिकारी, सदस्य, सीआरपीएफ चे सैनिक तसेच दात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहेमनोज महाराज गौड यांनी शास्त्रात दानाचे महत्त्व सांगितले असून जीवनदान देणाऱ्या रक्तदानास अधिक महत्त्व असल्याचे नमूद केले. भन्ते शिवनी शाक्यपुञ यांनी रक्तदान व सामाजिक कार्यात युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
अभय करवा म्हणाले, रक्तदाना प्रमाणे नेञदानास महत्त्व असून अधिक रक्तदाते निर्माण होण्याची गरज आहे. प्रभु भालेराव यांनी मानव सेवा व जीवन वाचविणे यास ख्रिस्ती धर्मात महत्त्व असल्याचे सांगितले. शेख मोहम्मद शेख नजीर यांनी रक्तदानाने दुसऱ्यांचे प्राण वाचले जात असून हे अल्लाह चे कार्य असल्याचे नमूद केले. यावेळी अॅड. अश्विनी धन्नावत, अॅड. बॉबी अग्रवाल, अॅड.अक्षय धोंगडे, अॅड. राजेंद्र चव्हाण, अॅड.लखन मुंगसे, अॅड. महेंद्र पोखरकर, डॉ. प्रतिक लाहोटी, डॉ. संतोष भाले, प्रशांत बागडी, रोहित भक्कड, अमित अग्रवाल, अमोल जिंदल यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.