आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावंचित घटकांना न्याय देण्याची त्याचबरोबर सर्व धर्मीयांना तसेच सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची स्व. गोपीनाथ मुंडे यांची सवय होती. त्यामुळे सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या जयंतीनिमित्त करणे हे अतिशय स्तुत्य असल्याचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
जालना येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त नीट, आयआयटी, एमपीएससी मध्ये यशस्वी ठरलेल्या सर्व धर्मीय, सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे, युवा नेते अक्षय गोरंट्याल, भाऊसाहेब घुगे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, पंडित भुतेकर, बद्री पठाडे, भानुदास घुगे, राजेंद्र राख, डॉ. श्रीमंत मिसाळ, संजय इंगळे, डॉ. प्रमोद डोईफोडे, डॉ. सतीश शेकडे, मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गीते, ब्रह्मा वाघ, गणेश घुगे, शशिकांत घुगे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन प्रशासन अधिकारी रामेश्वर राख, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी वाल्मिक गीते, सावता महासंघाचे अध्यक्ष संतोष डोंगरखोस, मंगेश जैवळ, अब्दुल्ला चाऊस, शांतीलाल गोरे, जगत घुगे, रमेश आंधळे, मधुकर काकडे, शिवानंद खरात, अरुण देशमुख, प्रकाश माणुसरे यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी अर्जुन खोतकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला.
भास्कर आंबेकर म्हणाले, मुंडे हे केवळ भाजपचे नेते नव्हते. तर इतर पक्षात काम करणाऱ्या बहुजन समाजातील नेत्यांना सुद्धा ते स्वतःच्या पालकाप्रमाणे वाटत असायचे. यावेळी ३५ विद्यार्थी, पालकांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी देवेंद्र बारगजे, संदीप हुशे, बाबासाहेब गीते, प्रकाश जायभाय, प्रा.ज्ञानेश्वर नागरे, गजानन ढाकणे, कृष्णा वाघ, भागवत वाघ, संजय कायंदे, संदीप चाटे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.