आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकोप्याचा संदेश:सर्वधर्मीयांनी एकोप्याने राहून सामाजिक एकता टिकवायला हवी : माजी मंत्री टोपे

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्व धर्मियांनी एकोप्याने राहून सामाजिक एकता जपवा, तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम करण्याच सल्ला माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी येथे दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शहर) च्यावतीने शहरातील मस्तगड येथील शीतल गार्डन येथे आयोजित दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात माजी मंत्री टोपे बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना टोपे म्हणाले की, जालना शहरातील झोपडपट्टी वस्तीमधील पिआर कार्ड (मालमत्ताधारक), पाण्याच्या टाकी काम पुर्ण होऊन देखील अद्याप पाणी पुुरवठा सुरळीत झाला नाही. शहरातील स्वच्छता, घंटागाडीचा विषय असो, सर्वसाधारण नागरिकांचा शीधापत्रिका, राशनचा विषय असो, घरकुल आदी विविध विषयांवर पुढाकार घेण्याचा संकल्प राजेश टोपे यांनी यावेळी घेतला.

सुत्रसंचलन करत असतांना युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी वरिल सर्व समस्यांबद्दल राजेश टोपे यांना माहिती दिली. त्याला अनुसरून टोपे यांनी जाधव यांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालू असे आश्वासन यावेळी उपस्थितांना दिले. युवक शहराध्यक्ष जाधव, शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे व त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे कौतुक करत सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. महंत प्रज्ञासागर बाबा यांनी सर्वप्रथम ईशस्तवनाने सुरूवात केली. व उपस्थितांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर महंत कोठी बाबा यांनी सुद्धा शुभेच्छा देत सदृढ, निरोगी, निरामय दीर्घ आयुष्य लाभो व येणाऱ्या नविन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.

विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी श्लोक वंदनाने सर्व समाजबांधवांना सामाजिक भावना जपावेत आणि एकमेकांबद्दल नेहेमीच सहकार्याची भूमिका ठेवावी असा सल्ला दिला. रेव्ह. बी बी कांबळे पालक साहेब यांनी सुद्धा प्रार्थनाद्वारे शुभेच्छा दिल्या. युवा नेते आश्विन अंबेकर यांनी शुभेच्छा देत तिन्ही पक्षांना एकत्र आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने जालना शहरात केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. शेख महेमुद, गणेश राऊत, बबलु चौधरी, राजेंद्र राख, एकबाल पाशा या सर्व नेत्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुुत्रसंचलन राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार विजय कांबळे यांनी मानले. प्रसंगी घनशामसेठ गोयल, सुरेश खंडाळे, शाह आलम खान, महाविर ढक्का, बाला परदेशी, डॉ. कैलास सचदेव, भरत पंचशिल, संजय मुथा, राम सिरसाट, अरुण पैठणे, मनकर्णाताई डांगे, आशाताई ठाकूर, फारुख तुंडीवाले, नुर खान, दिनकर घेवंदे, रमेश देहेडकर, रमेश गौरक्षक आदी उपस्थित होते.

आईच्या दु:खातून सावरत कोरोना काळात दिली सेवा संजय राख यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात स्वतःच्या आईच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसात कोरोना महामारीमुळे आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. आरोग्यमंत्री असताना लोकांचा या महामारीतून जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमाचे फळीत सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे रुग्ण नगन्य आहेत. त्यांच्या कार्यकाळात राज्यभरात लागेल त्या ठिकाणी व्हेंटीलेटर, ऑक्सीजन, व्हॅन, मेडिसीन यासह जे जे शक्य आहे ते सर्व आरोग्यमंत्री म्हणून आमदार टोपे यांनी उपलब्ध करून दिले.

बातम्या आणखी आहेत...