आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चातुर्मास प्रवचन:आपल्यात करुणा प्रकटू दिल्यास नक्कीच जिवाला शांती मिळेल

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दु;खी जीवाला करुणेचा भाव मिळाला तर किती चांगले. जो जीव दु:खात डुबून गेला तो मुळातच दु:खी होतो. परंतु अशा जीवाची कदर करणे, यालाच तर करुणा म्हणतात. आपल्यातही करुणा प्रगटू द्या, त्याने जीवाला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा उपदेश डॉ. गौतममुनिजी मसा यांनी येथे केला.

गुरु गणेशनगरमधील तपोधाममध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. करुणेचा भाव हा साऱ्या धर्मांना पवित्र करतो. हिंसा ही करुणेचा भाव आणू शकत नाही. परंतु करुणा मात्र हिंसेला रोखल्याशिवाय राहात नाही. करुणेची अनुभूती ही प्रत्येक जीवात्म्याने घ्यायला हरकत नाही. घरात बऱ्याचदा वाद-विवाद होतात. परंतु ज्या घरात करुणा नांदते ते घर स्वच्छ आणि निर्मळ असल्याशिवाय राहात नाही. भगवंत हे सुध्दा करुणेचे अवतार आहेत. पशू- पक्षांची हत्या करु नका, असं त्यांच सांगण असून ते आपण अंमलात आणलं पाहिजे, करुणेची अनुभूती ही आत्म्याला परमात्मा बनून जाते. भगवतांनी करुणेचे अनेक पाठ सांगितलेले आहेत. त्यातील काही पाठाचे वाचन, मनन, चिंतन या सूत्रातून करत आहोत. आपण जनावरांहून गेलेलो आहोत, असं कुणी म्हणायला नको.

साधू आणि साधना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण आपण कोणती बाजू निवडणार? हा खरा प्रश्‍न आहे, असेही डॉ. गौतममुनिजी म्हणाले. तत्पूर्वी वैभवमुनिजी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले, साधू जीवनात आज्ञा पाळावी लागते. धर्म साधना ही आवश्यकता पूर्ती करणारी हवी. जास्तीचे धन- दौलत आपल्याजवळ ठेऊन त्याचा काही लाभ होतो का? जे आवश्यक आहे, तेवढेच आपल्याला जवळ ठेवले पाहिजे. जास्तीचे धन ठेऊन ते आपल्या सोबत येणार नाही. साधू जीवन हे स्वच्छ आणि निर्मळ आहे. जे भवन, स्थानक निर्माण करत नाही. त्यांना रत्नाचीही आवश्यकता नाही. जेष्ठांनी केलेल्या आज्ञेचं पालन करणं ते त्यांचा परम धर्म समजतात. ते गहू, तांदळाचीही साठवणूक करत नाहीत. तुम्ही कितीही कमवून ठेवले तरी ते सोबत येणार नाही. मग साठवून ठेवण्याचा अट्टहास कशाला करता असा सवालही वैभवमुनिजी यांनी केला. यावेळी श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक- श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...