आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार:लोणचे बनवण्यासाठी गृहिणींची लगबग; हसनाबाद आठवडी बाजारात गावरान कैरीचा भाव 50 रुपये किलो

हसनाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात कैऱ्या विक्रीस आल्या आहेत. सध्या ५० रुपये किलो दराने कैरी विक्री केली जात असून लोणचे तयार करण्यासाठी गृहिणींकडून लगबग सुरु आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत कैरी व त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याच्या किंमतीत वाढ झाल्याने चटकदार लोणच्याला महागाईची झळ बसली आहे. मान्सून पूर्व पावसाच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात कैऱ्या गळून पडल्या आहेत. त्यामुळे लोणच्याची कैरी दुरापास्त होऊन त्याची आवक अजूनही बाजारात मंदावलेली आहे. मात्र, कालांतराने डेरेदार वृक्षांच्या सावलीखाली शेतीचे उत्पादन कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याच्या झाडावर कुऱ्हाड घातली गेली. सध्या बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांकडे गावरान आंब्याची झाडे दिसून येत आहेत. वातावरणात बदल तसेच अवकाळी मुळे बहुतांश आंब्याच्या मोहरा वर परिणाम झाला होता.

यामुळे गावरान आंब्याची गोड चव आंबट झाली आहे. दरम्यान, गृहिणींकडून लोणचे तयार करण्याची लगबग सध्या सुरु असून त्यासाठी लागणाऱ्या गावरान कैरीची जागा आता इतर आंब्याच्या कैऱ्यांनी घेतली आहे. लोणचे तयार करण्यासाठी लागणारा गरम मसाल्याचे भाव वाढल्याने लोणचे तयार करण्यासाठी खिशाला कात्री लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...