आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांना अल्फा ओमेगा राज्यस्तरीय पुरस्कार

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघातर्फे आरोग्य, शिक्षण, संगीत, उद्योग, सेवा, काव्य, अशा विविध क्षेत्रात स्वकतृत्वाने ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांना आल्फा ओमेगा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष आशीष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सन्मान सोहळ्यास रेव्ह. एम. डी. जाधव, फादर कुलूंदराज, पा. जगदीश चौधरी, पौलस वाघमारे, डॉ. वंदना बेंझमिन, राजेश थोरात, आशा ठाकूर, विवेक निर्मळ यांची उपस्थिती होती.

स्वागताध्यक्ष प्रभुदास ठाकूर, शाम भोसले यांची समायोचित भाषणे झाली. बाबा कसबे यांनी शास्त्रपाठ घेतला. किरण काळे यांनी गीते गायिली. प्रास्ताविक रिक्की कांबळे यांनी केले. सुञसंचालन अश्विनी रेड्डी यांनी तर अलेक जेकब यांनी आभार मानले. या सोहळयात संजय गायकवाड, सन्निध म्हस्के, उल्हास भोसले, स्नेहलता लोखंडे, रेव्ह.समीर गायकवाड, निलेश सोनवणे, डॉ. मार्क साखरपेकर, रेव्ह.संदेश म्हस्के, रिक्की कांबळे, शिला बनसोडे यांना पुरस्कारांनी सन्मानित केले.

बातम्या आणखी आहेत...