आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवार फेरी:निसर्गाला सोबत घेऊन शेतीतील पर्याय शोधावे

जाफराबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाला ओरबाडून कुठल्याही जीवाची प्रगती होणार नसून निसर्गाला सोबत घेऊनच शेतीतील पर्याय शोधावे लागतील असे ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांनी सांगितले.

एचडीएफसी बँक परिवर्तन व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बदल अनुकूलन प्रकल्पाच्या माध्यमातून जाफराबाद तालुक्यातील वीस गावांमध्ये सीताफळ, आंबा, पेरू या फळबागांची लागवड करण्यात आलेली आहे. फळबाग धारक शेतकऱ्यांसाठी रेपाळा येथे बुधवारी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खत, पाणी, छाटणी, विक्री व्यवस्थापनसह आदी विषयावर संजय मोरे यांनी शेतकऱ्यांची शिवारफेरी घेत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

यावेळी विष्णू गाडेकर, डॉ. पी. जी. देशमुख, पुरुषोत्तम फदाट, अनिल लोखंडे, उमेश शिंदे, आनंता देव्हडे, गजानन शिंदे, पंढरीनाथ देव्हडे, रामेश्वर देव्हडे, हानुमान जाधव, गजानन मुळे, विजय बराडे, शरिफखा पठाण, विष्णू भोपळे, चंद्रभान तिखे, विलास सपकाळ, कैलास सपकाळ, गणेश तिखे, शुभम देव्हडे, मयुर भालके, रामेश्वर सपकाळ, गोविंदा माकोडे, गजानन रावळकर, सुनीता फदाट, सीमा लोखंडे, भागीरथी जोशी, नूतन जाधव, अलका वैद्य, कावेरी तिखे, सुरेखा शिंदे, अनिता सपकाळ, ज्योती सपकाळ, लक्ष्मी भालके, ज्योती काळे, दगडुबा लोखंडे, संतोष जाधव, अमोल तिखे, रंगनाथ देव्हडे, नीलेश तिखे यांच्यासह बोरगाव बु, बोरगाव मठ, बोरी खुर्द, बेलोरा, खासगाव, पासोडी, मेरखेडा, विरखेडा, रेपाळा, हिवरा बळी या गावातील अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृष्णा फदाट, संदीप पंडित, किशोर सोनुने, रुपेश नागनाथवार, गजानन हिवाळे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...