आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांशी संवाद:मी राजकारणातील मोठ्या पदावर असलो तरी प्रथम शेतकरी, नंतर मंत्री; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन

पिं.रेणुकाई / पारध14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी हा देशाचा आत्मा आहे.कारण देशातील जनतेला अन्न पुरविण्याच काम शेतकरी अफाट कष्ट करीत पूर्ण करीत असतो. यासाठी प्रत्येकाने शेतकऱ्यांचा आदर करणे गरजेचे आहे. मी राजकारणात कितीही मोठ्या पदावर गेलो असलो तरीही मी पहिले शेतकरी अन् नंतरच देशाचा मंञी असल्याची भावना केंद्रीय राज्य रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे बुधवारी ग्रामस्थांशी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष राजेद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख, पंचायत समिती सदस्य गणेश लोखंडे, मोतीराम नरवाडे, भगवान बोडके, रमेश मिसाळ, संजय चंदनसे, भिमराव नरवाडे, भिकनराव नरवाडे, बाबुराव बेराड, शिवा लोखंडे, गजानन लोखंडे आदीची उपस्थिती होती. मंञी दानवे म्हणाले, शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना नेहमी राबवीत असते यासाठी शेतकऱ्यांनी शासन योजनेचा पुरेपुरे लाभ घेतला पाहीजे. त्यामध्ये सोलार योजना असो पोकरातील शेततळी, शेडनेट, पाँली हाऊस, औजार बँक आदीसह ईतर योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेतीतुन उन्नती साधली पाहिजे. कारण सतत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हतबल आणि कर्जबाजारी होऊ लागले आहे. या करीता शासनाच्या योजना जेवढ्या पदरात पाडता येईल त्या करीता शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहीजे.

मागील काळात भाजपा सरकारने जलयुक्त शिवार योजना राज्यात प्रभावीपणे राबविली त्यामध्ये भोकरदन तालुका अग्रस्थानी आहे. आज जलयुक्तच्या कामाचे फलीत शेतकऱ्यांना पहावयास मिळत आहे. नदी-नाल्यात पाणी साठल्यामुळे विहिरीतील जलपातळी वाढली आणि त्यापासून शेती उत्पादनात निश्चितच वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आता येणाऱ्या काळात शेतातील माल साठवणूकीवर भर देणे गरजेचे आहे. शेतातील माल काढल्यावर त्याला लगेच बाजार न दाखवीता त्याला वेअर हाऊस मध्ये ठेवा.

त्यावर तारण म्हणून कर्ज काढा आणि जेव्हा अपेक्षित भाव मिळेल तेव्हाच तो माल विका असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी शिवा आहेर, हरिभाऊ आहेर, बबनराव देशमुख, भगवान गावंडे, गजानन देशमुख, शंकर मयुरे, रविंद्र देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, धनराज बेराड, उमेश नरवाडे, अंकुश सिरसाठ, अनिल देशमुख, उबेद पठाण, रमेश आहेर, रामदास सिरसाठ, अंकूश आहेर, सुभाष मंञी, बालु देशमुख, बच्चु गुप्ता, रामेश्वर देशमुख, निलेश दळवी, प्रभाकर देशमुख, अभय देशमुख, पुरुषोत्तम देशमुख, सुरज गुप्ता आदी उपस्थित होते.

पावसाने नुकसान झालेल्या पिकांची थेट बांधावर जाऊन केली पाहणी भोकरदन तालुक्यातील पारध येथे झालेल्या अवकाळी पावसाने काही प्रमाणात नुकसान झाले यांची पाहणी मंत्री दानवे यांनी थेट बांधावर जाऊन केली. देशाचे राजकारण करत असताना ज्या भागाचे मी नेतृत्व करतोय अशा भागातील कष्टकरी शेतकरी सर्व सामान्य कार्यकर्ता यांची काही समस्या आहे का हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे.

आकाशामध्ये पतंग कितीही उंच उडत असला तरी त्याची दोर जमिनीवर असलेल्या व्यक्तींच्या हातात असते मी जरी देशाच्या राजकारणामध्ये झळकत असेल तर माझं दोर जालना जिल्ह्याच्या जनतेच्या हातामध्ये आहे, असे सांगितले. यावेळी परमेश्वर पाटील लोखंडे, शिवा पाटील लोखंडे, गणेश पाटील लोखंडे, दिलीप बेराड, सुरेश अल्हाट, देविदास जाधव, समाधान काटोले, शेषराव देशमुख आदी शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...