आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील १९७९ च्या दहावीच्या ५० विद्यार्थ्यांचे स्नेहमीलनच्या तब्बल ४४ वर्षानंतर आठवणींना उजाळा देत संपन्न झाले. आपल्या गोरगरीब,शेतकरी वर्गमित्रांना आधार, बळ देण्याचा निर्धार मेळावाच्या माध्यमातून करण्यात आला.
माजी विद्यार्थी अभय जोशी यांनी बालपण हे बालपण असते. वर्गमित्रांनी ज्या शाळेत शिक्षण पूर्ण केले.त्याठिकाणी जावून शाळेला वंदन करुन जिथे खेळलो, हसलो, बागडलो आणि खो-खो,कबड्डी इत्यादी विविध स्पर्धेत सहभागी होऊन शारीरिक,मैदानी खेळ खेळला.त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही बळकट झाल्याचे सांगितले. रणजित बांगर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ग्रामीण भागात मराठी शाळेत क्रिडांगण होते. आता त्या क्रीडांगणाची व्याप्ती, जागा, मैदान कमी होऊन शारीरिक मैदानी खेळ,जुने खेळ हरवले आहेत.
आताचे विद्यार्थी अभ्यासी जीवनात व्यस्त असून मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे खेळ हे लुप्त होत असल्याचे प्रामुख्याने जाणवत असल्याची खंत व्यक्त केली. तत्कालीन शिक्षक डी. पी. वावरे म्हणाले, त्यावेळच्या व आजच्या शिक्षण पद्धतीत खूप फरक असून पालकांनी दिलेली अमूल्य साथ व पालकांचा शिक्षकांवरील विश्वास यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुभाष मांगदरे, आर. टी. वाघुंडें, मंगला रोडे, बी. के. टाके, डी. पी. वावरे, के. ए. रोडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावली
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागण्यासाठी भूमितीय मालिका तयार करून विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती घालवली.त्यावेळी सोप्या भाषेत केलेले गणिताचे प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या जीवनशिक्षण मासिकेत प्रसिद्ध करण्यात आले.त्याचा विद्यार्थी व शिक्षक यांना मोठया प्रमाणात फायदा झाला असल्याचे गणिताचे तत्कालीन शिक्षक के.ए.रोडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.