आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड:लघुशंकेसाठी गेलेल्या मुलीस पळविले, दोघांवर गुन्हा दाखल; दोघांनी ग्रामस्थांकडे दुर्लक्ष करून मुलीचे अपहरण

अंबड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही घटना अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथे 26 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली

मामाच्या गावाकडे राहत असलेली मुलगी लघुशंकेसाठी बाहेर पडली असता, आलेल्या दोन जणांनी तिला दुचाकीवर बसवत अपहरण करून पळवून नेल्याची घटना अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथे २६ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांनी पाठलाग करीत त्या आरोपींना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिकांजवळ काही नसल्यामुळे मुलीला घेऊन आरोपी दुचाकीहून पसार झाले. शरीफ हबीब शेख, मोहम्मद मुनीर पठाण (ताडहदगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

अंबड तालुक्यातील ताडहादगाव येथील महिला मोलमजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत आहे. या महिलेस एक मोठा मुलगा व दोन मुली अशी तीन अपत्ये आहेत. एक मुलगी, मुलाचे लग्न झालेले असून, सर्वात लहान मुलगी (१५) मामाच्या घरी खडकेश्वर काही दिवसांसाठी राहण्यासाठी सोडले होते. २६ मे रोजी त्या मुलीचे घरचे पुणे जिल्ह्यातील शिरूळ येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते.

दरम्यान, त्यांना त्यांच्या चुलत भावाने रात्री १२ वाजेच्या सुमारास झालेला प्रकार सांगितला. रात्रीच्या वेळी खडकेश्वर गावातील झेंड्याजवळ मोबाइल गेम खेळत असताना ताडहदगाव येथील शरीफ हबीब शेख, मोहमद मुनीर पठाण यांनी त्यांच्या जवळील दुचाकी (एमएच २१ ई ९५२१) वरून खडकेश्वर येथे आले. त्यांनी लघुशंकेसाठी घराजवळ बाहेर पडलेल्या मुलीस दोघांमध्ये दुचाकीवर बसवून घेऊन निघून गेले.

याप्रसंगी त्यांना बरेच आवाज दिले. परंतु ते न थांबता मुलीस काहीतरी फूस लावून किंवा आमिष दाखवून अपहरण करत मोटारसायकलवर बसवून पळवून घेऊन गेले. त्यावेळी कोणतेही वाहन नसल्यामुळे आम्ही त्यांचा पाठलाग करू शकलो नाही. त्यानंतर ग्रामस्थ ताडहादगाव येथे शरीफ हबीब शेख व मोहंमद मुनीर पठाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांना झालेला प्रकार सांगितला. त्या तरुणांच्या नातेवाइकांनी तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना बोलावून घेतो, असे सांगितले. परंतु, अजूनही मुलगी घरी न परतली नाही. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात शरीफ हबीब शेख, मोहम्मद मुनीर पठाण या दोघांविरुद्ध अंबड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...