आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:अंबडला सावित्रीबाई फुले‎ विद्यालयाने काढली रॅली‎

अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सावित्रीबाई फुले‎ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात‎ सावित्रीबाई फुले यांची जयंती‎ उत्साहात साजरी करण्यात आली.‎ प्रारंभी सहाय्यक पोलिस निरक्षक‎ सोमनाथ नरके, संस्थेचे अध्यक्ष‎ रविंद्र खरात यांच्या हस्ते प्रतिमा‎ पूजन करुन रॅलीचे उदघाटन‎ करण्यात आले.

यावेळी पोलिस‎ उपनिरीक्षक ढाकणे, दिपक‎ खोब्रागडे, डॉ. राहुल बागुल, गोपाल‎ अडाणी, अशोक डोरले, केदार‎ लाहोटी, शितल खरात, नारायण‎ झरेकर, संजय कुलकर्णी, अभिमन्यू‎ गाढवे, मनोहर पटेकर, नितीन‎ निचळ आदी उपस्थित होते. रॅलीत‎ विविध महापुरुषाच्या वेशभूषा‎ करण्यात आली होती.

ही रॅली‎ महात्मा फुले यांच्या पुतळा ते माळी‎ गल्ली, सावित्रीबाई फुले मार्ग, कोर्ट‎ रोड, नूतन वसाहत, छत्रपती‎ शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास‎ वेढा मारून बसस्थानक, डॉ.‎ बाबासाहेब आंबडेकर पुतळा,‎ सावित्रीबाई फुले विद्यालयात‎ समारोप करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...