आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत जनार्दन स्वामी यांचे परमशिष्य स्वामी माधवगिरी महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने गोंधनखेडा येथे सोमवारी गौरी शंकर महादेव आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांना आमरसाची मेजवानी दिली जाणार आहेत. आमरसासाठी पाच क्विंटल आंबे मागविण्यात आले आहेत.
जाफराबाद तालुक्यातील गोधनखेड येथे उभारण्यात आलेल्या गौरी शंकर महादेव आश्रम मंदिराच्या उभारणीसाठी स्वामी माधव गिरीजी महाराज यांनी मुहूर्तमेढ रोवली आहे. या आश्रमात सोबतच जवखेडा येथे तसेच सोनगिरी येथेही नव्याने संत जनार्दन स्वामी यांच्या आश्रमाचे कथा महादेव मंदिराची उभारणी होत आहे.
निष्काम कर्मयोगी असलेल्या संत जनार्दन स्वामी यांच्या विचाराने प्रेरित होऊन धर्मकार्यासाठी विविध ठिकाणी आश्रम उभारण्याचे काम माधव गिरीजी महाराज यांच्या माध्यमातून होत आहे. जाफराबाद, भोकरदन तालुक्यात स्वामींचा मोठा भक्तपरिवार असून यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी भाविकांना आम रसांची मेजवानी दिली जाते. गौरी शंकर महादेव आश्रम मंदिरात सकाळी जन्म दिवसाचा सोहळा प्रवचन धार्मिक विधी व सायंकाळी आमरसाची मेजवानी असा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजनक तथा गौरीशंकर आश्रमाचे प्रमुख महेश गिरी महाराज यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.