आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धेचा खून:लिंगेवाडी येथे 80 वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथे ८० वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. पार्वतीबाई रंगनाथ शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी भोकरदन ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

सहायक पोलीस निरीक्षक पोलिस रत्नदीप जोगदंड यांनी सांगितले की, १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता लिंगेवाडी येथील घरात वृद्ध महिलेचे निधन झाल्याची माहिती मिळाली. भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. डॉक्टरांना गळ्यावर गळा आवळण्याच्या खुणा दिसल्या. रिपोर्टमध्ये सदर महिलेचा गळा आवळून खून झाल्याचा प्रकार उघड झाला. पार्वतीबाई यांना मुलगी आहे. ती औरंगाबाद येथे राहते, तर सावत्र मुलगा गावातच वेगळा राहतो. त्या एकट्याच घरी राहत होत्या.

बातम्या आणखी आहेत...