आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:पेशंटला घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेस आग

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजावरून जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये एका साप चावलेल्या पेशंटला इमर्जन्सीमध्ये घेऊन येताना १०८ रुग्णवाहिकेला दत्त आश्रमाजवळ भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.

जालना येथून तत्काळ दुसरी रुग्णवाहिका बोलावून रुग्णास शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब दत्त आश्रम येथे पोहोचून रुग्णवाहिकेस लागलेली आग जवानांनी आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमॅन नितेश ढाकणे, संतोष काळे, सूरज काळे, वाहनचालक विनायक चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...