आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:आठ महिन्यांमध्ये दररोज सरासरी 23 आरोपी फरार, तपास मात्र 12 टक्के

लहू गाढे | जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून देवतांच्या पुरातन मूर्ती चोरीला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरातूनही मारुतीच्या मंदिरातील दानपेटीतून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली. सातत्याने अशा घटनांत वाढ होत आहे. दुसरीकडे, फरार आरोपींनी मात्र पोलिसांची डोकेदुखी वाढवलेली आहे. ऑक्टोबर २०२० ते मे २०२१ दरम्यान आठ महिन्यांच्या काळात ५५२६ आरोपी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून गुन्हे करून फरार झाले. आठ महिन्यांतील एकूण आकडा पाहता सरासरी दररोज २३ आरोपी फरार झाले. पण दोन वर्षांमध्ये फक्त ६६६ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

फरार आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना फक्त १२ टक्के यश मिळाले.बीड जिल्ह्यातून सर्वाधिक १ हजार ९५६ आरोपी फरार आहेत. जांबसमर्थ येथील मंदिरातून ७०० वर्षांपूर्वीच्या देवतांच्या मूर्ती चोरून नेणारे आरोपी सापडले नाहीत. आरोपी मोकाट राहत असल्याने औरंगाबाद विभागाच्या पोलिसांना कोणत्याच वर्षी चोऱ्यांचा तपास ५० टक्क्यांच्या वर गेलेला नाही. बीट अंमलदारांना ४५८ दुचाकींचे वाटप करूनही गुन्हे प्रलंबित राहण्याचे प्रमाण आहे त्या स्थितीतच कायम दिसते. औरंगाबाद विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या, घरफोड्या, दुचाकी चोरी आदी घटना घडतच आहेत.

फरार आरोपींची आकडेवारी (ऑक्टोबर २०२० ते मे २०२१) जिल्हा फरार अटक जालना १६३८ २८१ उस्मानाबाद १०१३ ९३ औरंगाबाद ९१९ १३ बीड १९५६ २७९ एकूण ५५२६ ६६६

बातम्या आणखी आहेत...