आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोट:इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन कंपनीत स्फोट; सहा जखमी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीतील भट्टी गरम करणाऱ्या इलेक्ट्रिकल मशिनरीच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन लोखंड वितळणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गीताई स्टील कंपनीत घडली. यात दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विवेककुमार रामाश्रय राजभर (२८, बलिया, नवादा, उत्तर प्रदेश), अजिंक्य बाळासाहेब काकडे (२१, सिद्धिविनायकनगर, चंदनझिरा, जालना), माहेश्वरी अवधेश पांडे (३०, चितोना, गोपालगंज बिहार), संतोष मेवालाल (३८, पथराह, मिर्झापूर) यांच्यावर जालन्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये, तर गंभीर जखमी असलेल्या अजयकुमार सीताराम राजभर (२५, गोठवा, बलिया, जि. बलिया, उत्तर प्रदेश), परविंद सिंगासन (सालेम, जि. बलिया पचखोरा उत्तर प्रदेश) यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये नेहमीच लाेखंडाच्या भट्ट्यांमध्ये स्फोट होऊन अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांतून अनेकांचे बळी जात आहेत. अनेक कामगारांना अपंगत्व येत आहे. दरम्यान, गीताई कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण, सहायक पोलिस निरीक्षक सावळे, बीट अंमलदार वाघ यांनी भेट दिली. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले. काही जणांची प्रकृती चिंताजनक सांगितली जात आहे. स्फोट झाल्यानंतर अनेक जण उड्या मारून त्या ठिकाणाहून बाहेर पडले, असे काही कामगारांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...