आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तन:जांब समर्थला मूर्तींच्या पुनर्स्थापनेपूर्वी तास चालणार मिरवणूक

जालना4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जांब समर्थ (ता.घनसावंगी) येथील श्री राम मंदिर संस्थानमधील मूर्ती चोरी होऊन शोध लागलेल्या मूर्तीचा पुनर्स्थापना सोहळा येत्या २५ व २६ नोव्हेंबर रोजी जांब समर्थ श्रीराम मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. पुनर्स्थापनेपूर्वी तीन तास मूर्तींची भव्य मिरवणूक चालणार असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे.

दोन दिवसांच्या या भव्य सोहळ्याला संत महंतांसह जिल्ह्यातील बहुतांशी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक तथा श्रीराम मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी श्री भूषण महारुद्र स्वामी यांनी दिली. सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या घराण्याच्या देवघरातील अर्थात जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील देव देवतांच्या पंचधातूंच्या प्राचीन मूर्ती काही दिवसांपूर्वी चोरी गेल्या होत्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या सर्व मूर्तींसह चोरट्यांना पकडण्यात पोलिस यंत्रणेला यश आले.

या सापडलेल्या सर्वच मूर्तींची पुनर्स्थापना करण्याच्या दृष्टीने आयोजिलेल्या या भव्य सोहळ्याला प्रामुख्याने गुजरातमधील श्रीमत शंकराचार्य द्वारका पीठ तथा धर्मसभा विद्वत्संघाचे अध्यक्ष ब्रम्हचारी निरंजनानंद, वारकरी प्रबोधन समितीचे (मुंबई) अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर शास्त्री, जालन्याच्या श्रद्धेय ताईमहाराज, श्रीराम मंदिराचे समर्थभक्त श्री रामदास महाराज आचार्य, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांताचे संपर्कप्रमुख धर्माचार्य डॉ.जनार्दन मेटे, गुरूवर्य श्री भगवान महाराज आनंदगडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे. या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, राजेश टोपे, आमदार बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, संतोष दानवे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विलासराव खरात, सतीश घाटगे पाटील, शिवाजीराव चोथे, डॉ. हिकमत उढाण हे उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड, चोरी प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपअधीक्षक सुनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, प्रशांत महाजन, संजय लोहकरे हे देखील या वेळी उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी सर्व मूर्तींची मिरवणूक सकाळी आठ ते दुपारी अडीच वाजे दरम्यान काढण्यात येणार आहे. दुपारी दोन ते तीन मंदिरात आगमन सोहळा व आरती होणार असून तीन ते पाच या वेळात कृतज्ञता सोहळा होणार आहे. सायंकाळी पाच ते सहा सांप्रदायिक उपासना तर रात्री नऊ ते अकरा बीड येथील मठपती समर्थभक्त ऋतूपर्णबुवा रामदासी यांचे कीर्तन होणार आहे.

सलग तेरा तास त्रयोदशाक्षरी राममंत्र जप होणार
शनिवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सात असे सलग तेरा तास त्रयोदशाक्षरी राममंत्र जप होणार असून सकाळी सहाला श्री राममूर्ती स्नपन विधी, उद्वार्चन सोहळा आणि महाभिषेक पूजा होईल. सकाळी साडे सात दरम्यान पुनर्स्थापना विधी मुहूर्त आणि महाआरती होईल. सकाळी साडे आठ ते साडे नऊ श्री मारूतीस रूद्राभिषेक तर सकाळी दहा ते साडेबारा दरम्यान पवमान स्वाहाकार आणि पूर्णाहुती होईल. दुपारी साडेबाराला महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन सायंकाळी सहाला सांप्रदायिक उपासना होऊन सात वाजता उत्सवाची सांगता होईल.

बातम्या आणखी आहेत...