आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:रहेबर फाउंडेशनचा पुढाकार; 50 बेरोजगारांना हातगाड्यांचे वाटप

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी सफा बैतूल माल संचालित रहेबर फाउंडेशनच्या वतीने जालना शहरातील ५० बेरोजगारांना हातगाड्यासहित फळे भाज्या व कटलरीच्या वस्तूचे वाटप करण्यात आले. यामध्ये हातगाडी व हातगाडी व पाच वस्तू असे प्रत्येक बेरोजगाराला वाटप करण्यात आले.

या वेळी उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू बोलताना म्हणाले की गोरगरिबांची सेवा करणे ही सर्वात मोठी सेवा आहे व यामुळे ईश्वर प्रसन्न होत असतो. या कार्यक्रमाला मुफ्ती अब्दुल रहमान, मुफ्ती फईम साहब, मुफ्ती रईस, हाजी अब्दुल हमीद, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली, राष्ट्रवादीचे इकबाल पाशा,नगरसेवक शेख शकील, शेख वसीम अादी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...